साहित्य:
१ वाटी ग्रीक योगर्ट
पाऊण वाटी साखर (किंवा आवडीनुसार कमी अधिक गोड)
१ टीस्पून वेलची पावडर
१५-२० केसरच्या काड्या
२ चमचे दुध
अर्धी वाटी आवडीनुसार सुका मेवा
कृती:
१) २ चमचे दुधात केसरच्या काड्या भिजत ठेवाव्यात.
२) योगर्ट साखर आणि वेलची पूड एका मोठ्या भांड्यात एकत्र करून, व्यवस्थित मिक्स करून घ्यावे, साखर एकजीव होईपर्यंत मिसळावे.
३) केसाराचे दुध आणि सुका मेवा घालून पुन्हा एकदा मिसळावे.
४) सेट करण्यासाठी फ्रीज मध्ये ४-५ तास ठेवावे.
५) सर्व्ह करताना वरून बदाम पिस्त्याचे काप आणि २-३ केसरच्या काड्या पसरवाव्यात.

Comments
Post a Comment