वांगीभात

साहित्य:
२ चमचे तेल
१ चमचा मोहरी, जिरे, उडीदडाळ , मेथी दाणे
३-४ कडीपत्त्याची पाने
२-३ सुक्या मिरच्या
पाव वाटी शेंगदाणे
२ चमचे चिंचेचा कोळ
३ मध्यम आकाराची वांगी
१ वाटी तांदूळ (२३५ g)

कृती:
१) सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून, २० मिनिटे पाण्यात भिजून घ्यावा आणि पाणी काढून टाकावे.
२) कुकर मध्ये तेल घेऊन मध्यम आचेवर गरम करावे.
३) फोडणीला मोहरी,जिरे,उडीदडाळ, कडीपत्ताआणि मेथी दाणे घालावेत.
४) सुक्या मिरच्या तोडून फोडणीत घालाव्यात
५) शेंगदाणे घालून मिश्रण थोडे परतून घ्यावे.
६) त्यावर चिंचेचा कोळ घालावा
७) वांग्याचे लांबट उभे पातळ काप करून ते त्यात मिसळून घ्यावेत.
८) वांगी थोडी नरम झाली की भिजवलेले तांदूळ घालून, त्यावर २ इंच येईल एवढे पाणी घालावेत.
९) कुकर बंद करून ३ शिट्या घ्याव्यात आणि गॅस बंद करावा, थंड होऊन वाफ गेल्यावर उघडून, भात सर्व्ह करावा.
१०) हा वांगीभात बुंदी रायता सोबत सुंदर लागतो.


Comments