दही वडे

साहित्य :
पाव कप उडिद डाळ
पाऊण कप मुग डाळ
एक कप घट्ट दही
साखर (आवडीनुसार / optional)
तेल (तळण्यासाठी)
चवीप्रमाणे मीठ, चाट मसाला , जिरपूड, मिरची पूड

कृती:

१) दोन्ही डाळी मिक्स करून दोन तीनदा व्यवस्थित धुवून घ्या. आणि पाण्यात रात्रभर किंवा ६ तासांसाठी भिजत ठेवा. सकाळी मिक्सर मधून अगदी बारीक क्रीम सारखं  वाटून घ्या (त्यात चरचरीत लागू नये.)
२) एका भांड्यात मिश्रण काढून घ्या आणि हातानेच५-७ मिनिटे  फेटून घ्या. म्हणजे त्यात हवा मिक्स होईल.
३) या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून उकळलेल्या तेलात सोडा. तेल मध्यम आचेवर गरम करावे. (जास्त गरम तेलात तळायचे नाहीत वडे)
४) हलका सोनेरी रंग आल्यावर काढून घ्यावेत. (वडे तळायचे नसतील तर आप्पे पात्रात शालो फ्राय करता येतात. आणि चवीला सारखेच लागतात.)
५) एका भांड्यात कोमात पाणी घेऊन त्यात थोडा हिंग आणि मीठ घालून मिसळून घ्यावे, त्यात हे तयार झालेले वडे सोडावेत. १५ मिनिटे भिजू द्यावेत.
६) १५ मिनिटानंतर बाहेर काढून हलक्या हाताने पिळून पाणी काढून टाकावे.
७) एका मोठ्या भांड्यात दही घेऊन त्यात थोडेसे पाणी आणि आवडीनुसार साखर घालून नीट मिक्स करावे.
७ सर्व्ह करताना वाटीत घेऊन त्यावर तयार केलेले दही पसरवून वरून मीठ, चाट मसाला, मिरची पूड आणि जिरपूड भुरभुरावी.


Comments